वैशाख वणव्याने महाराष्ट्र तापला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा कडाका येत्या आठवड्यातही वाढणार आहे. विदर्भात गुरुवारपर्यंत (ता. २६) उष्णतेची लाट राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून, या आठवड्यातही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यात विविध भागांत सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता.

लोहगावमध्ये पारा ४० अंशांवर
लोहगावमध्ये रविवारी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर उर्वरीत पुण्यात ३८.६ अंश तापमान नोंदविले गेले. येत्या आठवड्यात पुण्यातील हवामान मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे; तसेच शहरातील तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

Web Title: summer temperature increase weather