अजित पवार तुमच्यासाठीही नॉट रिचेबल असतात का?, वहिनींनी दिले उत्तर... | Sunetra Pawar Exclusive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunetra Pawar Exclusive

Sunetra Pawar Exclusive : अजित पवार तुमच्यासाठीही नॉट रिचेबल असतात का?, वहिनींनी दिले उत्तर...

Sunetra Pawar Exclusive : राज्यात विरोधीपक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल असले की राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजते. यापूर्वी अजित पवार यांच्यासह पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता.

दरम्यान अजित पवार तुमच्यासाठी नॉट रिचेबल असताता का?, असा प्रश्न सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार कामात खूप व्यस्त असतात. बहुतेक वेळा ते बाहेर असतात. त्यामुळे खूप कमी वेळ ते घरी असतात. ते माझ्यासाठी कधीच नॉट रिचेबल नसतात. त्यांना जेव्हा काम असते तेव्हा ते कॉल करतात किंवा मला काम असले तर मी त्यांना कॉल करते. पण ते कधी नॉट रिचेबल नसतात.

अजित पवारांनी शेवटचा सिनेमा कोणता बघितला?

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

'तुम्ही शेवटचा कोणता सिनेमा बघितला?' असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, शेवटचा सिनेमा पठाण बघितला. पुण्यावरुन मुंबईकडे जात असतांना एकाने मला लॅपटॉवर लावून दिला होता. त्यामध्ये मग भगवे-बिगवे बिकिनी घातलेलं सगळं बघितलं. असं म्हणून त्यांनी सभागृहात हशा पिकवला.

अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला.

टॅग्स :Sharad PawarAjit PawarNCP