पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे भाजपला फायदा- तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अट्टहासामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. त्यांच्या या अट्टहासाचा फायदा कोणाला झाला, हे महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला. राष्ट्रवादी भवनात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेचा भाजपला नेहमी फायदा होतो, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची बोलणी सुरू असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. आमच्यासाठी अशोक चव्हाण काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली असती तर बरे झाले असते, मात्र राज्यात इतरत्र ठिकाणी आमची कॉंग्रेसबरोबर सकारात्मक बोलणी सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, अमरावती तसेच जिल्हा परिषदांच्या बाबतीतही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बोलणी सुरू आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी आणि समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याला आमचे प्राधान्य आहे. आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर नेत्यांना देण्यात आले आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि भाजपशी आघाडी करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच त्यांना पक्षाचे ए, बी फॉर्मही दिले जाणार नाहीत. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने राष्ट्रवादीतच आहेत, असा दावा या वेळी तटकरे यांनी केला.

ऐतिहासिक भाषणाकडे लक्ष
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या युतीवर आम्ही भाष्य करणे योग्य नाही. भाजपला वॉशिंग मशिन आणि शिवसेना नेत्यांना भुंकणारं कुत्रं अशी संभावना केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक भाषणाकडे आमचेही लक्ष लागल्याचे तटकरे म्हणाले.

Web Title: sunil tatkare press conference