देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात त्यांच्यासोबत एवढे आमदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की भाजपचा गटनेता म्हणून मला अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह एकूण 170 आमदारांचा पाठिंबा आहे.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की भाजपचा गटनेता म्हणून मला अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह एकूण 170 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यानंतर राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आणि शपथ घेतली.  

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र हे दस्तावेज आज (ता. 25) सकाळी साडेदहा वाजता सादर करण्यात आले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. 

यामध्ये भाजपचे 105, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे 54 आणि अपक्ष 11 असे मिळून 170 आमदारांचे समर्थन असल्याचे फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट झाले आहे. या निमित्ताने सत्ता स्थापन कशाच्या जोरावर झाली हे दिसत आहे. राज्यपालांनी याच आधारे सत्ता स्थापन करावी यासाठी आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. मुकुल रोहतगी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आल्याचे म्हटले आहे. आम्हाला पवार कुटुंबातील कलहाचे देणेघेणे नाही, कारण राष्ट्रवादीचा आम्हाला पाठिंबा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court hearing on petitions filed by maha vikas aghadi about maharashtra government formation