मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी मुद्दाम लपवून ठेवली. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावत त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com