
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असल्यामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमासाठी नेण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न केला असता त्यांनी या कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम त्या व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्यासाठी केला जात आहे. गरीब मायबाप जनतेच्या पैशावर नवीन जुमला या सरकारने बांधला आहे. करदात्यांचे पैसे जाहीरातींवर खर्च केले जातात, कार्यक्रमासाठी करोडो रुपयांचा चुरडा करण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे शासन तुमच्या दारी द्या, ग्रामपंचायतीला द्या असं सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, 'जयंत पाटील मंत्री असाताना त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पोहचण्याचे काम केलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर न करून स्व:ताचं प्रमोशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत केविलवाणा प्रयोग केला जात आहे.'
त्याचसोबत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम स्वत:चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. या कार्यक्रमातून नेत्यांचं प्रमोशन सुरू आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शासन आपल्या दारी मुळे ST बस रद्द
शिर्डी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमासाठी नेण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना आपल्या गाडीतून शाळेत सोडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे.