Supriya Sule : सुप्रिया सुळे संतापल्या! पहाटे लावलेल्या भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर म्हणाल्या...

सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर लावण्यात आला होता
NCP Supriya Sule News
NCP Supriya Sule Newssakal

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं भडकल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवर दिली आहे.

या बॅनरवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "एकतर बॅनर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे बॅनरवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो बॅनरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे."

NCP Supriya Sule News
Shivsena : उद्धव ठाकरे 'त्या' चुकीमुळे येणार गोत्यात; सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला कलाटणी मिळणार?

पुढे त्या म्हणाल्या, "माझा फोटो किंवा बॅनर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात. तर हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, हा बॅनर लावणाऱ्याला पोलिसांनी पकडावे अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे."

महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला होता. तर या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो होता.

NCP Supriya Sule News
Thackeray vs Shinde: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाकडे बहुमताचा आकडा नाही; काय म्हणाले सरन्यायाधीश...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com