Supriya Sule : सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री होताना बाळासाहेब म्हणाले होते, "कमळाबाईला पटवण्याची..."

शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष होणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
Supriya Sule Balasaheb Thackeray
Supriya Sule Balasaheb ThackeraySakal

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची काल घोषणा केली. यानंतर सध्या चांगलीच खळबळ सुरू आहे. त्यांच्या ऐवजी आता उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्षाचं काम पाहण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्त सुप्रिया सुळेच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीचा एक किस्सा.

हा अनुभव शरद पवार यांनी आपल्या लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये सांगितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या राजकीय एन्ट्रीला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल आपल्या पुस्तकात शरद पवार लिहितात, बाळासाहेबांनी एखाद्याला एकदा आपलं मानलं, की बाकी सारं त्यांच्यासमोर फिजूल असायचं. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होतेच. माझ्यावर ते तुटून पडायचे. परंतु जेव्हा सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तेव्हा बाळासाहेबांच्यातल्या उत्कट भावनाशील माणसाचं मला दर्शन झालं."

Supriya Sule Balasaheb Thackeray
Supriya Sule : पहिल्या नजरेत भावली पवारांची लेक, वाचा सदानंद अन् सुप्रिया सुळेंची लव्हस्टोरी

नक्की काय झालं होतं?शरद पवार लिहितात...

"झालं असं होतं, की महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एक जागा रिक्त झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चेनुसार या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीला संधी देण्याचा निर्णय झाला. माझ्या पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुप्रियाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. सुप्रियाच्या विरोधात उमेदवार कोण असणार, हे जाणून घेण्यासाठी मी बाळासाहेबांना फोन केला."

Supriya Sule Balasaheb Thackeray
Sharad Pawar Resigns : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? तर अजित पवार यांचं काय..?

"मी त्यांना सांगितलं, “सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते आहे. युतीतर्फे कोण उमेदवार असेल?” बाळासाहेब उत्तरले, "शरदबाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत कसं नाही? सुप्रिया सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे. आज तिला संधी आल्यावर मी तिच्याविरोधात उमेदवार देईन, असं तुम्हाला कसं वाटलं?" मी प्रश्न केला, “तुमचं ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेईल ?” यावर त्यांचं उत्तर होतं, "कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com