राजकीय भूकंपानंतर काय आहे, सुप्रिया सुळेंच व्हॉट्सऍप स्टेट्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे. 

यानंतर अजित पवार यांच्यावरचा राग सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेस्टसद्वारे दाखवल्याचं दिसून आलं. ज्या प्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच प्रमाणे आता आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा भाग नाही, असं शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने अजित पवार यांना कुटुंबापासून दूर व्हावं लागल्याने अजित पवार यांच्या साठी खूप मोठा धक्का मानला जातो, याच वेळी अजित पवार भाजपच्या गोटात गेल्याने शरद पवार आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसल्याचे समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभार व्यक्त करत म्हटले आहे की, त्यांनी पुन्हा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्या बद्दल आभारी आहे, राज्यातील जनादेशाला शिवसेनेने नाकारले आहे, त्यांनी दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लवकरच विधिमंडळात बहुमत सिद्ध करू असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya sule ncp leader and daughter sharad pawars latest whatsapp status