शिवसेनेचा खासदार ना गल्लीत; ना दिल्लीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - "मोदींच्या नोटाबंदीने ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. स्वतःचे पैसे बॅंकेतून काढण्यासाठी लोकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले. देशभरात दीडशे जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पापाचे धनी पंतप्रधान मोदी हेच आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. 

कळंब तालुक्‍यातील डिकसळच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भाषणाच्या सुरवातीलाच "तुम्ही निवडून दिलेले खासदार कुठे आहेत? ना दिल्लीत ना गल्लीत' असा सवाल करत सुळे यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला. ""जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या; मी गुलाल खेळायला येईन. तेव्हा आपण मतदारसंघात फिरून खासदार शोधा, शंभर रुपये मिळवा, अशी स्पर्धा घेऊ. 25 वर्षे एकत्र राहिलेल्या शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुका येताच संसार मोडला; पण हे त्यांचे नाटक आहे. आरोप-प्रत्यारोप, रुसवे-फुगवे कशासाठी आहे, हे राज्यातील सुजाण जनता ओळखते. जिल्ह्यात कुठल्याही निवडणुका आल्या, की कॉंग्रेस, शिवसेना, भाजप यांच्यात छुपी युती होते; पण कॉंग्रेस आमच्यावरच भाजपशी युती केल्याचा आरोप करते, ही नाटकं आता बंद करा,'' असा दमदेखील सुळे यांनी या वेळी भरला. 

Web Title: supriya sule in osmanabad