अजित पवार यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल येत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावर सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली असून 'मी आजारी असून अंथरुणावर आहे, पण खूप काही घडत असल्याचे म्हटले आहे'.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल येत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावर सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली असून 'मी आजारी असून अंथरुणावर आहे, पण खूप काही घडत असल्याचे म्हटले आहे'.

अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे. वेगवगळ्या चर्चा होत असल्या तरी आज (ता.27) साडेआठ वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule statement on ajit pawar resigns