'महाराष्ट्र क्रांती सेना'.. मराठ्यांचा नवा पक्ष..!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली असून गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

पक्ष स्थापनेस मराठा समाजातील काही लोकांचा विरोध होता. या विरोधाला डावलून पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासाठी एक मराठा ..लाख मराठा अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. मराठा समाजाचे प्रश्न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते.  

या मेळाव्यात राजकीय पक्षाची स्थापना करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असे या पक्षाचे नाव आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पक्षस्थापन करण्यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात मेळावा पार पडला होता.

Web Title: Suresh Patil launches political party Maharashtra Kranti Sena for Maratha community