अतिरीक्त शिक्षकांसाठी गुड न्यूज; २४ जूनच्या मार्गदर्शक सूचनेत बदल करुन घेतला ‘हा’ निर्णय

अशोक मुरुमकर
Monday, 17 August 2020

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. लॉकडाऊन जाहीर करुनही रुग्ण संख्या कमी झाली नाही. याचा सर्व घटकांवर परिणाम झाला. ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. यामुळे शाळा सुरु करण्यास अडचणी आल्या आहेत.

अहमदनगर : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. लॉकडाऊन जाहीर करुनही रुग्ण संख्या कमी झाली नाही. याचा सर्व घटकांवर परिणाम झाला. ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. यामुळे शाळा सुरु करण्यास अडचणी आल्या आहेत. कधी शाळा सुरु होणार हे अद्याप निश्‍चित नाही. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे विपरीत परस्थिती निर्माण झाली आहे. या परस्थिती सरकारने शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच २४ जूनला एक आदेश काढून काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांना शाळांमध्ये बोलावून त्यांचा ऑनलाईन शिक्षणासाठी उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबत आदेश काढला असून यामध्ये म्हटले आहे की, ज्या शिक्षकांची सेवा कोरोना व्हायरस संदर्भात कामकाजासाठी अधिग्रहित केल्य आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना कार्यमुक्त कराव. आस्थापनेवर समायोजित केलेल्या अतिरिक्त शिक्षकांनाही मूळ शाळेत बोलावून ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे २४ जूनमध्ये काढलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले होते. मात्र त्यामध्ये आता सुधारणा करण्यात येत आली आहे.

कोविड संदर्भातील कामकाजातून त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करावे. त्यानंतर संबंधित शिक्षकांना कोणत्याही आस्थापनेवर समायोजित करावे. समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणी जवळच्या शाळेत बोलावून ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे आदेशात म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surplus teachers will be used for online education at the nearest school