
Sushma Andhare : शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मांडवली झाली? सुषमा अंधारे असं का म्हणाल्या...
महाराष्ट्राचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा सुरू आहे. या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टिका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कोकणाने निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले. पण नियमाला अपवाद असतो तसे वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही दिले. काळ उत्तर देत असतो. रामदास कदमना उत्तर देण्यासाठी त्यांच्या दहा पट ताकदीचा संजय कदम नावाचा चेहरा आज शिवसेनेत दाखल होत आहे.
"मी शिवसेना उल्लेख करते कारण ओरिजनल शिवसेना आम्ही आहोत, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. ओरिजनल बरोबर नसताना काय होत हे कसब्यात दिसलं", असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
"संजय कदमांच्या विभागवार सभांची सुरुवात होत आहे. शिवगर्जना सभा, पक्षप्रमुख यांच्या सभा, विभागवार सभा कशासाठी? निवडणूका लागलेल्या नाहीत तरी सभा घेण्याचे कारण मतांसाठी नाही तर मराठी माणसाच्या हितासाठी आहे," असे अंधारे म्हणाल्या.
"आम्ही वाट पहात आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनात समस्यांबद्दल सत्ताधारी बोलतील. परंतु त्याजागी हक्कभंग इ. मोठे मोठे शब्द घेऊन ते उभे आहेत.अंधारे यांनी आशिष शेलार यांना देखील टोला लगावला. हम बोल रहे हैं, चोर की दाढी मे तिनका! तो आशिष शेलार क्यों दाढी टटोल रहे हैं?," असा टोला सुषमा अंधारे यांनी शेलारांना लगावला.
"दावोसला २०-२० तास एकनाथभाऊ जागे राहत होते. मात्र दावोसच कार्यालय ५व ६ ला बंद होत होत. तर ६ ते २ एकनाथभाऊ कुणासाठी काम करत होते?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
"एक हजार कोटीची जागा एकनाथ शिंदेंनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने विकली, ज्याबद्दल आशिष शेलारांनी जनहित याचिका दाखल केली. सत्तेत आल्यावर शेलार बोलले नाहीत, त्यांच्यात काय मांडवली झाली? किरीट भाऊंनी डंपिंग ग्राउंडवर छोट्या छोट्या बाटल्या शोधण्यापेक्षा अख्ख डंपींग ग्राउंड देते. नोंदणी न झालेल्या पक्षाच्या सभेसाठी बीकेसीच्या ग्राऊंडवर करोडो खर्च कुठुन झाला? नारायण राणेंच्या बेकायदा बांधकामाबद्दल बोला," असे अंधारे म्हणाल्या.