
Sushma Andhare: 'मी सुखरुप...' मारहाणीच्या प्रकरणावर अंधारेंनी लाईव्ह करत दिले स्पष्टीकरण
गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. फेसबुक लाईव्ह येत त्यांनी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला. तसेच, जाधव यांनी केलेल्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव यांनी काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडिओ जाहीर केला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभा गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला. असा उलट आरोप अंधारे यांनी जाधव यांच्यावर केला केला आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
नेमकं प्रकरण काय आहे?
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला. अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये आहेत.
या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पण त्यांचा हा आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.