नागपुरात सापडला 'घरचा भेदी'; ISI एजंटला अटक

नागपुरात सापडला 'घरचा भेदी'; ISI एजंटला अटक

नागपूर- पाकिस्तान आणि अमेरिकेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या आएसआय एजंटला आज (ता.08) नागपुरात अटक करण्यात आली आहे. या आयएसआय एजंटचे नाव निशांत अगरवाल असे आहे. तो गेली चार वर्ष ब्राह्मोस अॅरोस्पेस विभागात नोकरी करत होता. 

ब्राह्मोस अॅरोस्पेस प्लांट विभागातून उत्तर प्रदेश दहशतवादी पथकाने (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजंट अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करत आयएसआय आणि अमेरिकन गुप्तचर विभागाला ब्राह्मोस मिसाईलबाबत गुप्त ठेवलेली महत्वपूर्ण माहिती पुरवित असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. त्याला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे गेली चार वर्ष गुप्तपणे काम करणाऱ्या निशांतबाबत कोणाला कसल्याही प्रकारचा संशय आला नाही. निशांतला 2017-18 चा यंग सायंटिस्ट या पुरस्कारानेदेखिल गौवरविण्यात आले होते. तपास यंत्रणा निशांतची याप्रकरणात पुढील चौकशी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com