आम्ही स्वाभीमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निषाणा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

संभाजीराजेंनी विनोद तावडे यांचा पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करतानाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करताना म्हटले आहे की, मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे. 

संभाजीराजेंनी कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरात तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, कित्येकांचे संसार पाण्याखाली गेले. मात्र, सरकारने हवी तेवढी मदत न दिल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीर संभाजीराजेंनी विनोद तावडेंच्या मदत मागणी पद्धतीवरुन सरकारला लक्ष्य केल्याचे स्पष्ट दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Kolhapurkar does not need a begging says Sambhajiraje on Vinod Tawades vedio