
शेतकऱ्याच्या पोराने वीज मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र
कोल्हापूर: शेतीला सलग १० तास दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलन राज्यभर सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Sheeti) यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात (Kolhapur) महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले. तर कार्यकर्त्यांनी कागलमध्ये महावितरण कार्यालयाला आग लावली. आज इचलकरंजीत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवरच साप सोडत वीज पुरवठा देण्याची मागणी केली. दरम्यान एका शेतकऱ्याने चक्क रक्ताने लिहलेले पत्र उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) पाठविले आहे. यामुळे हे आंदोलन अजून चिघळणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. काय लिहले आहे त्या पत्रात जाणून घेऊया.
काय लिहले त्या पत्रात
कागल येथील गोरंबे गावच्या निलेश कोगनोळे या शेतक-याच्या पोराने मागणी मान्य व्हावी यासाठी उर्जामंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले. हाडांची काड अन रक्ताच पाणी झालं शेतक-यांच्या पोरांनी रक्तान पत्र लिहली राज्यकर्त्यांनो आतातरी तुम्हाला पाझर फुटणार आहे का ? वेळीच सावध व्हा नाहीतर जी पोर वाघाशी आणि गव्याशी झुंज देतात त्यांना तुम्हाला तुडवायला वेळ लागणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कागल तालुक्यातील गोंरबे येथील नितेश कोगनोळे या शेतकऱ्याने रक्ताने लिहले पत्र
हेही वाचा: इचलकरंजीत स्वभिमानी आक्रमक: चक्क महावितरण कार्यालयात सोडला साप
इचलकंजीत नेमके काय घडले
रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजताना येणाऱ्या अडचणी घेऊनच शहरात शेतकऱ्यानी महावितरण कार्यालयावर आज आंदोलन केले. जोरजोरात घोषणा देत कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. रात्रीच्या वेळी पाणी पाजताना सापडलेला सापच त्यांच्या टेबलवर सोडला. या गंभीर प्रकारानंतर महावितरणचे कर्मचारी घाबरले. प्रश्नांचा भडीमार करत कार्यकारी अभियंता राठी यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयात बसून राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana Msedcl State Agitation Nilesh Koganole Sent A Letter To Nitin Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..