सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन, रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soyabin loss.jpg

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन, रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कापूस आणि सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) योग्य भाव मिळावा यासाठी नागपूरच्या संविधान चौकात सुरू अन्नत्याग आंदोलन सुरु होतं.

जमावबंदीचे आदेश असतानाही आंदोलन सुरू असल्यानं पोलिसांनी कारवाई केली. तुपकर आणि कार्यकर्त्यांना बुलढाणा पोलिसांकडे स्वाधिन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

तुपकर यांचं पोलीस कस्टडीतही अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

loading image
go to top