देशात महाराष्ट्रच "सर्वांत स्वच्छ' 

प्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

राज्यात सध्या एक लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 13 शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे. 

याची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा आणि वेंगुर्ला या पाच गावांचा समावेश आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पावलात महाड, माथेरान, रोहा, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, वेंगुर्ला, मोवाड, भगूर, मलकापूर, पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, करमाळा, कुर्डुवाडी या नगरपालिका व नगर परिषदेची 19 शहरे दोन ऑक्‍टोबर 2015 रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. दुसऱ्या पावलात 26 जानेवारी 2016 पर्यंत चिखलदरा, कर्जत, मुरुड-जंजिरा, पेण, राजापूर, मालवण, उमरेड, काटोल, मोहपा, रामटेक, महादूला, शिर्डी, शिरपूर-वरवाडे, फैजपूर, त्रिंबक, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव कसबा, तळेगाव दाभाडे, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरूर, रहिमतपूर, दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढे, सांगोले या नगरपालिका व नगर परिषदेची 31 शहरे, तर कोल्हापूर महापालिका अशी एकूण 32 शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 

पाथरी, खोपोली, देवरूख, लांजा, सावंतवाडी, देवगड-जामसंडे, कुडाळ, वाभवे-वैभववाडी, कणकवली, भंडारा, तुमसर, पवनी, कळमेश्वर, खापा, नरखेड, मैंदा,देवळी, पुलगाव, संगमनेर, देवळाली प्रवरा, नंदूरबार, सटाणा, येवला, बारामती, दौंड, लोणावळा, आळंदी, भोर, जुन्नर, राजगुरुनगर, उरण, इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव आणि पंढरपूर ही 36 शहरे दोन ऑक्‍टोबर 2016 पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. 

त्याचबरोबर दोन ऑक्‍टोबर 2016 नंतर बदलापूर, बल्लारपूर, कोपरगाव, शेंदूरजना, खुलताबाद, पाथर्डी, रावेर, सावदा, जामनेर, कसाई-दोडामार्ग, बार्शी, रिसोड, मंगळूरपीर, जव्हार, श्रीगोंदा, भूम, अंबरनाथ, सिल्लोड, श्रीरामपूर, उमरगा, कन्नड, गेवराई, कळमनुरी, बिलोली, कंधार, मुदखेड, हादगाव, राहुरी, राहता पिंपळस, शिराळा, माहूर, इचलकरंजी या नगरपालिका व नगर परिषदेची 32 शहरे; तर नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, पुणे, नाशिक, सांगली, वसई-विरार आणि नगर ही महापालिकेची आठ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. 

- देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा व वेंगुर्ला या पाच शहरांचा समावेश 
- हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली महापालिका 
- हागणदारीमुक्त शहरांमध्ये सर्वाधिक 13 शहरे पुणे जिल्ह्यातील 
- नगर, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे 
- सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरे 
- पहिल्या टप्प्यात 19 शहरे हागणदारीमुक्त 
- दुसऱ्या टप्प्यात 32 शहरे हागणदारीमुक्त 
- तिसऱ्या टप्प्यात 36 शहरे हागणदारीमुक्त 
- कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, धुळे महापालिका संपूर्ण हागणदारीमुक्त 
- सर्व शहरे दोन ऑक्‍टोबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार 

Web Title: swachh bharat abhiyan