बघा.. तुमचं शहर किती 'स्वच्छ' आहे..!

टीम ई सकाळ
गुरुवार, 4 मे 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पतेतून सुरू झालेल्या 'स्वच्छ भारत' अभियानामध्ये भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र केविलवाणी अवस्था असल्याचे चित्र आहे. देशभरातील 434 शहरांचे 'स्वच्छ सर्वेक्षण' घेण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा समावेश झाला आहे. इतर सर्व शहरे स्वच्छतेच्या बाबतीत मागेच असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते. 

किंबहुना, एकूण 434 शहरांच्या या यादीत भुसावळ 433 व्या क्रमांकावर आहे. भिवंडी-निझामपूर 392 व्या क्रमांकावर आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर 137 व्या स्थानी आहे. या सर्वेक्षणातील 'टॉप 50' शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ तीन शहरे आहेत. या 'टॉप 50'पैकी 31 शहरे गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील आहेत. गुजरात (12), मध्य प्रदेश (11), आंध्र प्रदेश (8), तेलंगणा (4), तमिळनाडू (4) यांच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 

यंदाच्या सर्वेक्षणातून झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधील सुखद 'सक्‍सेस स्टोरी'ही समोर येत आहेत. झारखंडमधील सर्वेक्षण झालेल्या सर्व नऊ शहरांनी 2016 आणि 2014 मधील क्रमवारीपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे; तर छत्तीसगडमधील सर्वेक्षण झालेल्या आठपैकी सात शहरांनी अशी कामगिरी केली आहे. 

ही आहे महाराष्ट्रातील स्वच्छतेची स्थिती 
 
शहर क्रमांक
नवी मुंबई 8
पुणे 13
बृहन्मुंबई 29
शिर्डी 56
पिंपरी चिंचवड 72
चंद्रपूर 76
अंबरनाथ 89
सोलापूर 115
ठाणे 116
धुळे 124
मिरा भाईंदर 130
नागपूर 137
वसई विरार 139
इचलकरंजी 141
नाशिक 151
सातारा 157
बदलापूर 158
जळगाव 162
पनवेल 170
कोल्हापूर 177
नंदूरबार 181
नगर 183
नांदेड 192
उल्हासनगर 207
उस्मानाबाद 219
परभणी 229
यवतमाळ 230
अमरावती 231
कल्याण डोंबिवली 234
सांगली मिरज कुपवाड 237
मालेगाव 239
उदगीर 240
बार्शी 287
अकोला 296
औरंगाबाद 299
बीड 302
अचलापूर 311
वर्धा 313
लातूर 318
गोंदिया 343
हिंगणघाट 355
जालना 368
भिवंडी निझामपूर 392
भुसावळ 433
Web Title: Swachh Survekshan 2017 rankings of Maharashtra cities