उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाध्याय’ योजना; तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

Varsha Gaikwad
Varsha Gaikwad

पुणे - इयत्ता पहिली ते दहावीच्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच स्वाध्याय (स्टुडंट व्हॉट्‌सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना) योजना शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

राज्यातील जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे देण्यात आली. या योजनेचे उद्‌घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, प्राथमिक व माध्यमिक संचालक दत्तात्रय जगताप, राज्य परिषदेचे सहसंचालक डॉ. विलास पाटील, माहिती तंत्रज्ञान आणि समन्वय विभागाचे उपसंचालक विकास गरड आदी उपस्थित होते. 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, लिडरशीप फॉर क्वॉलिटी आणि कॉन्वेगीनिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. 

या अंतर्गत दर शनिवारी भाषा व गणित या विषयातील त्या-त्या वर्गाच्या अध्ययनावर आधारित दहा-दहा प्रश्न संच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार प्रश्नसंच पूर्ण करतील आणि त्यानंतर प्राप्त होणाऱ्या उत्तरपत्रिकांवरून स्वतःचे मूल्यमापन करण्यास मदत मिळणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com