सणसरमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण 

सणसरमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण 

भवानीनगर - सणसर (ता. इंदापूर) परिसरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने आज परिसरात पाहणी केली. भवानीनगरनजीक एका शेतकऱ्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांनी सणसरमधील खासगी दवाखान्यातून तीन दिवस उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याने शुक्रवारी त्यांनी पुढील तपासणी केली असता त्यांना न्यूमोनियाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांना स्वाइन फ्लू सदृश निदान झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सणसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने आज सकाळपासून या परिसरात पाहणी केली. इतरांमध्ये कोठेही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र घाबरून न जाता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केंद्राचे प्रमोद पाठक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com