मुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे

शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा, असे थेट विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यामुळे सरकारमधील ते सोळा भ्रष्ट मंत्री कोण आहेत आणि याबाबत मुंडे काय खुलासा करणआर असा प्रश्न आता पडला आहे.

चाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा, असे थेट विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यामुळे सरकारमधील ते सोळा भ्रष्ट मंत्री कोण आहेत आणि याबाबत मुंडे काय खुलासा करणआर असा प्रश्न आता पडला आहे. गली-गली मे शोर है, चौकीदार ही चोर है’ चाळीसगावच्या सभेचा हा एकच सूर होता, असेही मुंडे यांनी सांगितले. 
 

चाळीसगावात सभेला जमलेल्या शेतकऱ्यांपैकी फक्त दोघांची कर्जमाफी झाल्याचा पुरावा मिळाला. बाकी सर्व शेतकऱ्यांचे हात अजूनही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. सभेसाठी जमलेली गर्दी हा अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचा पुरावा असल्याचे मुंडे म्हणाले आहेत.
 

निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या निमीत्ताने मुंडे आज जळगावात आहे त्यांनिमीत्त ते बोलत होते. निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकांनी परिवर्तन यात्रेला समर्थन दिले असल्याचेही मुंडेनी म्हणाले. चाळीसगाव येथील सभेला जाताना ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आल्याचेही मुंडेकडून सांगण्यात आले आहे. अशा आशयाची ट्विट मुंडे यांनी केले आहेत.

Web Title: Take Action Against 16 Courpted Misnister Says Mundhe