मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या; शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील "सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. 

सकल मराठा समाज रायगडतर्फे मराठा क्रांती आंदोलनादरम्यान निरपराध व सुविद्य व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार व इतर गंभीर गुन्हे पोलिसांमार्फत दाखल करण्यात आले, असे या पत्रात नमूद केले आहे. ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये डॉक्‍टर, वकील व नोकरदार महिलांचाही समावेश आहे, त्यामुळे अशी सुजाण माणसं गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतील ही बाब पटण्यासारखी नसल्याचे स्पष्ट करत पवार यांनी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या यादीसह पत्र दिले आहे. शरद पवार नवी मुंबई दौऱ्यावर असताना यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना देण्यात आले होते. 

Web Title: Take back the crime of Maratha protesters Sharad Pawar letter to Chief Minister