संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे - राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - शेतकरी संकटात असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे केली.

राज्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाला आमचे पूर्ण समर्थन असेल, मात्र या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत फसवी असून त्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ झालेला नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. परंतु, या वेळी २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली म्हणून नव्हे, तर बॅंकांनी कर्ज नाकारल्यामुळे ही उचल कमी झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही थकबाकी दिसते. त्यामुळे बॅंका त्यांना कर्ज नाकारत आहेत. शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळाली नसल्याने बॅंकांनी व्याज आकारणी सुरूच ठेवली असून ते अन्यायकारक आहे, असे शेट्टी म्हणाले. 

Web Title: Take special session of Parliament says Raju Shetty