साजरा होतोय लोकशाहीचा उत्सव...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशीच्या निवडणुकीत ७७ केंद्रांवर जणू लोकशाहीचा उत्सवच साजरा झाला. वृद्ध, दिव्यांग, गृहिणी, नोकरदार अशा सर्व स्तरांतील वयोगटातील स्त्रियांच्या सहभागाने लोकशाहीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित झाले.

 मेळघाटातील, तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवणमधील आदिवासी महिलांनी मतदानात मोठ्या संख्येने भाग घेतला. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची गर्दी होती. तिथेच तनिष्कांसाठीही मतदानाचा सोहळा रंगला. 

पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशीच्या निवडणुकीत ७७ केंद्रांवर जणू लोकशाहीचा उत्सवच साजरा झाला. वृद्ध, दिव्यांग, गृहिणी, नोकरदार अशा सर्व स्तरांतील वयोगटातील स्त्रियांच्या सहभागाने लोकशाहीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित झाले.

 मेळघाटातील, तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवणमधील आदिवासी महिलांनी मतदानात मोठ्या संख्येने भाग घेतला. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची गर्दी होती. तिथेच तनिष्कांसाठीही मतदानाचा सोहळा रंगला. 

खेड्या-पाड्यातील शेतात कामावर जाणाऱ्या, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या महिलांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रांवर गर्दी केली, ती ‘तनिष्का ताई’ला निवडून देण्यासाठी .. आदिवासी बहुल मेळघाटातही तनिष्कांचे काम पोचल्याचे आज मतदानाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. सोलापूर जिल्ह्यात २१ ठिकाणी मतदान झाले. तुंगत, भोसे, विठ्ठलवाडी, मानेगाव, उपळाई, सावळेश्‍वर, वडवळ, चारे, फताटेवाडी या गावांमध्ये तनिष्कामय वातावरण होते. तनिष्का उमेदवारांनी गावोगावी केलेल्या कामांमुळे त्यांच्याविषयी आपुलकीची भावना दिसली. माळशिरस तालुक्‍यातील दहिगावात दोन्ही उमेदवारांनी एकत्र प्रचार केला. कोणालाही मत दिले, तरी चालेल; पण मतदान करा, असे वेगळेच दृश्‍य तिथे पाहायला मिळाले. याच तालुक्‍यात बोरगावात यात्रा होती. मतदान करूनच महिलांनी यात्रेचा आनंद लुटला. पंढरपूरलगतच्या गावांतील महिलाही मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्या.  

सकाळ रिलीफ फंडातून तनिष्कांच्या पुढाकाराने बऱ्याच ठिकाणी विहिरी, ओढ्यातील गाळ काढण्याची कामे झाली. ‘सकाळ’ने, तनिष्कांनी आमचा पाणीप्रश्‍न सोडवला, आम्ही मतदान करणारच, असे सांगणाऱ्या मतदार सोलापूरप्रमाणेच लातूर, उस्मानाबादमध्येही होत्या. दुष्काळामुळे होरपळलेल्या अनेक गावांत महिला तनिष्कांच्या मतदानासाठी घराबाहेर पडल्या. खासदार सुनील गायकवाड यांनी लातूरच्या मतदान केंद्राला भेट देऊन निवडणूक प्रक्रिया तनिष्कांकडूनच समजून घेतली. माजी महापौर स्मिता खानापुरे यांनीही मतदान केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंबमध्ये तिरंगी, तर उर्वरित तेरा ठिकाणी दुरंगी लढत रंगली.  उस्मानाबाद, पाटोदा, तुळजापूर, मंगरुळ, जेवळी, उमरगा, नारंगवाडी, वाशी, कळंब, येरमाळा, भूम, पाथरूड, ईट, परंडा येथे मतदान  झाले. लगेचच एक तासानंतर मतमोजणी झाली. 

अमरावती जिल्ह्यात शहरात, तसेच चांदुरबाजार, करजगाव, अंजनगावसुर्जी, कापूसतळणी, रहिमापूर, पथ्रोट, अंबाडा, दर्यापूर, मंगरुळ दस्तगीर आणि मेळघाटातील हरिसाल, आकी यागावांत उत्साहाने मतदान झाले. अमरावतीच्या महापौर रीना नंदा यांनी मतदान केले. उमेदवारांशी संवाद साधला. मेळघाटातही तनिष्कांचा आवाज घुमू लागल्याचे दिसून आले. मायक्रोसॉफ्टने दत्तक घेतलेल्या हरिसालमध्ये मतदानानंतर आदिवासी मतदारांनी जल्लोष केला. अशीच उर्त्स्फूतता नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या आदिवासी महिला मतदारांनी दाखवली. तिथेच महिला कंडक्‍टरांनीही मतदान केले. नांदगाव तालुक्‍यातही मतदान झाले. तनिष्कांसह बचत गटांच्या महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

Web Title: tanishka election