टीसी महाविद्यालयास स्वायत्तता

टीसी महाविद्यालयास स्वायत्तता

बारामती शहर - येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक स्वायत्तता प्रदान केली.  

‘अनेकांत’चे अध्यक्ष अरहतदास सराफ, सचिव जवाहर वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी याबाबत आज माहिती दिली की, शैक्षणिक स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाने अनुदान आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला होता. महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान झाल्यामुळे यापुढील काळात विविध अभ्यासक्रमांची कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख रचना करण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. प्राप्त परिस्थितीनुसार रोजगाराच्या विविध संधींचा विचार करून महाविद्यालय आपल्या पातळीवर विविध अभ्यासक्रम सुरू करू शकेल. याबाबतचे स्वातंत्र्य स्वायत्ततेमुळे महाविद्यालयास प्राप्त झाले; तसेच इतरही अनेक बाबतींत नवीन प्रयोग  करण्यासह नवीन संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासही महाविद्यालयास आता कोणाच्या परवानगीची गरज भासणार नाही. व्यवसाय व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या स्वायत्ततेमुळे थेट होणार आहे. उच्च गुणवत्ता व अधिक चांगल्या अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार आहे.

महाविद्यालयास स्वायत्तता दर्जा प्राप्त झाल्याने शिक्षणाचे अनेक प्रयोग करणे शक्‍य होईल. जेणेकरून येथील विद्यार्थी विकासाच्या अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू शकेल. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्युच्च दर्जाचे शिक्षण देणे शक्‍य होईल.
 - जवाहर वाघोलीकर, सचिव, अनेकांत एज्युकेशन सोसायटी

उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता व कौशल्ये यांचा समन्वय राखणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यास मिळणाऱ्या डिग्रीबरोबर एखाद्या कौशल्यसिद्धतेमुळे तो समाजातील आव्हानांना पेलण्यास समर्थ बनेल. स्वायत्तता दर्जा प्राप्त झाल्यामुळे व्यवसायाभिमुख समाजोपयोगी बदल करणे शक्‍य होईल.
 - डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, प्राचार्य, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com