
...तुम्हा तर त्यांचे साथीदार, आमचीच वेळ टळली; अजित पवारांच्या टीकेला शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
उद्या पासून राज्याचं अर्थ संकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनाच्या पुर्व संध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र मविआने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. पवारांच्या टीकेला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या अर्थसंकल्पातील काही मुद्दे सांगीतले ते म्हणाले की, "अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी मनसिकता दिसली आहे"
"अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले,"हसिना पार्करला चेक दिलेले नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची त्यांची धमक नव्हती, त्यांचे साथीदार अजित पवारांसोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली"
"अजित पावर वैफल्यग्रस्त ते झाले आहेत. अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर सत्तेतून बाहेर गेल्यानंतर मासा पाण्यावीना तडफडतो तशी त्यांची परिस्थिती झाली आहे." असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.