शिक्षकाने नाकारला वेतन आयोग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

संगमनेर - शेतकऱ्यांसाठी सरकारला काही तरी ठोस करता यावे, यासाठी तालुक्‍यातील समनापूर येथील प्राथमिक शिक्षकाने सातवा वेतन आयोग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. किरण बाबासाहेब खैरनार, असे त्यांचे नाव आहे. 

खैरनार यांनी या पत्रात म्हटले आहे, ‘साहेब, माझ्या वैयक्तिक गरजा मी कमी केल्या आहेत. वीस वर्षांच्या नोकरीत दोन वेतन आयोगांचा लाभ घेतला. माझ्या शेतकरी बांधवांची वर्षानुवर्षे खालावत चाललेली परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाल्याने, मी वैयक्तिकरीत्या सातवा वेतन आयोग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.’

दरम्यान, कर्जामुळे जीवन संपवण्याचा विचार करणाऱ्या सौंदाणे (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील एका शेतकऱ्याला धीर देत  खैरनार यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त केले.

Web Title: The teacher declined the pay commission