कर्जाच्या आमिषाने शिक्षकाची एक लाखाची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

विनोद शर्मा याने कदम यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांचा विश्‍वास संपादन करून प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर प्रोसेसिंग फी म्हणून थोडे थोडे असे एक लाख आठ हजार 255 रुपये पैसे बॅंक खात्यावरून स्वीकारले.

सोलापूर : वैद्यकीय कारणासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून शिक्षकाला एक लाख आठ हजार 255 रुपये भरण्यास सांगून कर्ज न देता गंडविले. याप्रकरणी नामदेव सौदागर कदम (वय 32, रा. लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. विनोद शर्मा असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 25 मे ते 2 जून 2018 या कालावधीत घडली आहे. 

कदम यांना कर्ज हवे होते. त्यांनी ऑनलाइन जाहिरात पाहून तीन लाख रुपयांच्या वैद्यकीय कर्जासाठी ऑनलाइन अर्ज भरला. त्याआधारे विनोद शर्मा याने कदम यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांचा विश्‍वास संपादन करून प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर प्रोसेसिंग फी म्हणून थोडे थोडे असे एक लाख आठ हजार 255 रुपये पैसे बॅंक खात्यावरून स्वीकारले. तरीही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कदम यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत. 
 

Web Title: Teacher has fraud by 1 lakh