राज्यात शिक्षकांचे 31 प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

सोलापूर - राज्याचा शिक्षण विभाग नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. मग कधी जुन्या पेन्शनचा मुद्दा असो किंवा शिक्षकांच्या बदलीचा. या सगळ्या प्रकारामुळे शिक्षण विभागाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असते. त्यातच आता राज्यातील शिक्षकांचे प्रकार किती, हा मुद्दा सोशल मीडियातून चर्चेला जाऊ लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभाग चर्चेत आला आहे.

मागील काही वर्षांमध्ये शिक्षण विभागात ऑनलाइन कामाला महत्त्व दिले जात आहे. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची माहिती ही ऑनलाइन भरण्याचे आदेश दिले आहेत. त्याला काही प्रमाणात शिक्षकांनी विरोध केला; पण शेवटी नाईलाजाने ऑनलाइनचे काम शिक्षकांना करावेच लागले. शिक्षकांच्या प्रकारांचा विचार केला, तर प्रशासनाने अनेक प्रकार केले आहे. त्यामुळे कुणाचाच कुणाला मेळ लागत नसल्याचे स्पष्ट होते.

राज्यामध्ये 100 टक्के अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित, पायाभूत पदवाढ प्रस्तावित, पायाभूत पद मंजूर; परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित, पायाभूत पद मंजूर, वैयक्तिक मान्यता प्राप्त; परंतु आर्थिक तरतुदींच्या प्रतीक्षेतील, अनुदानास पात्र घोषित तुकडीवरील, विनाअनुदानित, मूल्यांकनात पात्र परंतु अद्याप अघोषित, अनुदानास पात्र परंतु आर्थिक तरतुदीच्या प्रतीक्षेतील, अनुदान पात्र, 20टक्के टप्पा मंजूर परंतु दोन वर्षांपासून पुढील अनुदान टप्प्याच्या प्रतीक्षेतील, शिक्षण सेवक (सहायक शिक्षक, परिविक्षाधीन), जुनी पेन्शन योजना लागू असणारे, नवीन परिभाषीत अंशदान पेन्शन योजनेतील, 2005 पूर्वीचे परंतु अंशतः अनुदानित असल्याने नवीन पेन्शन योजना लागू झालेले, 2005 पूर्वीचे, अंशदान पेन्शन योजनेला कोर्टात आव्हान दिलेले म्हणून कुठलीच कपात नसणारे, इंग्रजी माध्यमातील, रात्रशाळेतील, शिक्षकांचे असंख्य प्रकार आपल्या प्रशासनाने तयार केले आहेत.

Web Title: teacher transfer