गुढीपाडव्याच्या दिवशीही शिक्षक पगाराविना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

मराठी नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सर्वत्र सुरू आहे; मात्र मार्चचे वेतन अद्याप मिळाले नसल्यामुळे राज्यातील 25 शिक्षकांमध्ये नाराजी आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो; एप्रिलची 6 तारीख आली, तरी पगार झालेला नाही. 

मुंबई -  मराठी नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सर्वत्र सुरू आहे; मात्र मार्चचे वेतन अद्याप मिळाले नसल्यामुळे राज्यातील 25 शिक्षकांमध्ये नाराजी आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो; एप्रिलची 6 तारीख आली, तरी पगार झालेला नाही. 

राज्यातील शाळांमधील शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन मिळते. वित्त विभागाकडून शिक्षकांच्या युनियन बॅंकेतील खात्यांत ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करण्यात येतात. परंतु, या महिन्यात शिक्षकांचे वेतन रखडले आहे. शिक्षकांना दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, निवडणूक आणि इतर कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. पगार रखडल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. 

शनिवार आणि रविवारी बॅंका बंद असल्यामुळे शिक्षकांना थेट सोमवारीच पगार मिळणार आहे. त्यामुळे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी शिक्षकांना इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचे पगार त्वरित न केल्यास सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष राजेश पंडया यांनी दिला आहे. 

Web Title: teacher without salary on Gudi Padva day