साडेआठ हजार शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट 

Teacher's Day gift to eight and a half thousand teachers
Teacher's Day gift to eight and a half thousand teachers

सोलापूर : राज्यात गेल्या 15 ते 20 वर्षापासून बिनपगारी काम करणाऱ्या आठ हजार 419 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आज शासनाने शिक्षक दिनाची अनोखी भेट दिली आहे. 738 शाळा व दोन हजार 55 तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बिनपगारी असलेल्या गुरुजींना शासनाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. शासनाने 9 मे ला एक व 2 जुलैला अनुदानास पात्र असलेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

हा निर्णय घेऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला होता. मात्र, तरीही या बिनपगारी शिक्षकांना पगार देण्याबाबतचा शासन निर्णय निघत नव्हता. अनेक शिक्षक संघटनांनी हा निर्णय निघावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने या शिक्षकांना शिक्षक दिनाची अनोखी भेट देताना एक एप्रिल 2018 पासून 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे. अनेक दिवसांपासून बिनपगारी असलेल्या शिक्षकांना उशिरा का होईना शासनाने न्याय दिल्याची भावना या शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. अनुदान प्राप्त शाळांनी 19 सप्टेंबर 2016 मधील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक असल्याचेही या शासन आदेशात म्हटले आहे. 

अद्यापही 551 शिक्षकांचा जीव टांगणीला 
9 मे च्या शासन आदेशामधून वगळण्यात आलेल्या राज्यातील 51 माध्यमिक शाळा व 19 माध्यमिक शाळेतील 54 तुकड्यांना अनुदान मंजूर केलेले नाही. यामध्ये 551 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यादानाचे काम करत आहेत. या शाळा व तुकड्यांची फेरतपासणी झाली आहे. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक, आयुक्त असा प्रवास करत या शाळांचा चौकशी अहवाल मंत्रालयात सादर झाला आहे. मात्र, या शाळांमधील शिक्षकांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने अद्यापही घेतला नाही. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या 551 शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. या शिक्षकांच्या अनुदान मंजुरीचा आदेश केव्हा निघणार याकडे त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

आकडे बोलतात

अनुदान मंजूर झालेल्या शाळांची स्थिती 

-प्राथमिक शाळा-158 

-प्राथमिक शाळांच्या तुकड्या-504 

-या दोन्ही शाळांवरील शिक्षक-1417

-माध्यमिक शाळा-580

-माध्यमिक शाळांच्या तुकड्या-1551

-या दोन्ही शाळांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-7002 

-एकूण-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी : 8419 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com