बारावी निकालाचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार काल रात्री मागे घेतला. त्यानंतर शिक्षकांनी तपासलेल्या 87 लाख उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे देण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. दोन दिवसांत या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा होतील, असेही सांगण्यात आले. 

बारावीच्या निकालाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल सायंकाळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत सरकारने शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या. 

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे तीन-चार महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. त्यानंतर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला; परंतु शिक्षण विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद येत नसल्याने अखेर बारावीच्या परीक्षांदरम्यानच बहिष्कार आंदोलन सुरू झाले. परीक्षेदरम्यान तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका पडून राहिल्यानंतर अखेर तात्पुरत्या काळासाठी बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे तपासण्याचे थोडेच काम आता शिल्लक आहे. आठवडाभरात सर्व उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे सुपूर्त केल्या जातील, अशी माहितीही महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली. 

विनोद तावडे यांनी आज दुपारी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आढावा बैठक घेतली. या वेळी प्रा. अनिल देशमुख आणि मुंबई विभागीय बोर्डाचे सचिव डॉ. एस. बोरसे उपस्थित होते.

Web Title: Teachers Federation boycott of XII investigation last night