आंदोलनामुळे आज राज्यातील शाळा बंद?

आंदोलनामुळे आज राज्यातील शाळा बंद?

मुंबई : शिक्षक-शिक्षकेतर तसेच सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी सोमवारी (ता. 9) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील अनुदानित-विनाअनुदानित शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे. यानंतरही सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षक संघटनांनी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. 

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत आदी 11 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे सदस्य गुरुवारपासून (ता. 5) काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे. 

रायगडमध्ये राष्ट्रवादीच राहणार एक नंबर : तटकरे​

समन्वय समितीमध्ये फूट 
महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीमार्फत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मात्र, काही शिक्षक संघटनांनी गणेशोत्सवानंतर शाळा बंद आंदोलन करण्याची सूचना केली. त्यानंतरही समितीने सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावरून संघटनांमध्ये फूट पडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीत फूट पडल्याने शाळा बंद आंदोलन पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्‍यता कमी असल्याचेही एका संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com