फळ पीक विम्यासाठी तांत्रिक समिती स्थापन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेकरिता 17 सदस्यीय राज्यस्तरीय तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी हवामान धोक्‍याचा फेरविचार करून शास्त्रोक्त पद्धतीने फळ पीकनिहाय हवामान धोके आणि त्याचे मानदंड निश्‍चित करणे, पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे आर्थिक नुकसान ठरविण्यासाठी ही समिती काम करेल. दीड महिन्याच्या आत समितीने अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करायचा आहे. 

फलोत्पादन विभागाचे संचालक समितीचे अध्यक्ष असून, सहसंचालक सदस्य सचिव आहेत. समितीची कार्यकक्षा अशी असेल - पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करावयाचे फळ पीक व किमान क्षेत्र याबाबत शिफारस करणे, पिकांच्या उत्पादकता व गुणवत्तेवर हवामान घटकांच्या होणाऱ्या दुष्परिणामाबाबत शास्त्रोक्त माहिती उपलब्ध आहे अशा पिकांचा समावेश करणे, फळ पीकनिहाय हवामानाच्या धोक्‍यांच्या मानदंडाची शास्त्रोक्त पद्धतीने शिफारस करणे, त्याआधारे पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यावरील दुष्परिणामांचे विश्‍लेषण करून त्यातून आर्थिक नुकसानीच्या मर्यादेचे सूत्र ठरविणे, समितीने आपला अहवाल प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दीड महिन्याच्या आत कृषी आयुक्तामार्फत सरकारला सादर करायचा आहे. 

Web Title: Technical Committee for fruit crop insurance