परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून.....

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 July 2020

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरूंच्या आग्रहाखातर आहे असे दाखविण्याचा फार्स असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज केला.

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरूंच्या आग्रहाखातर आहे असे दाखविण्याचा फार्स असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर परीक्षा होणार का नाही? एटीकेटी विद्यार्थ्यांचे काय होणार? याबाबत कोणतीच स्पष्टता विद्यार्थ्यांना आली नाही उलट मंत्र्यांनी अजूनच गोंधळात भर टाकली, असे तावडे यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘परीक्षा घेता येणार नाही अशी कुरुगुरूंची कथित वक्तव्यं निवडून पत्रकार परिषदेत दाखवायचे काम उदय सामंत यांनी आज केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली ती शासन निर्णय परीक्षा न घेण्याचा जो आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी होती. या बैठकीला मंत्री उपस्थित नाहीत अशा बैठकीचं निवडक चित्रीकरण त्या त्या कुलगुरूंची परवानगी न घेता माध्यमांच्यासमोर व जनतेसमोर आणणं हा कुलगुरूंचा अपमानच आहे,’’ असे तावडे यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical education exam cancel decision vinod tawde politics