'..म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेताहेत'

T Harish Rao
T Harish Raoesakal
Summary

महागड्या विजेमुळं मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत.

राज्यातील शेतीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न आता शेजारच्या राज्यांतही चर्चिल्या जात आहे. वीज टंचाईमुळं त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात (Telangana) शेती विकत घेत असल्याचं वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव (T Harish Rao) यांनी केलंय. महागड्या विजेमुळं उद्योजक कर्नाटकात (Karnataka) जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीनं तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचं टी हरीश राव यांनी सांगितलंय.

सिद्धीपेठ मतदारसंघात (Siddhipeth Constituency) नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राव बोलत होते. महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची 24 तास अखंड वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण करता येत नसल्यानं ते तेलंगणात येऊन शेतजमिनी खरेदी करत असल्याचं हरीशरावांचं म्हणणं आहे. तर, तेलंगणात वीजसोबत भरघोस सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्र सरकारकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा हा तसा बहुचर्चित विषय आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेती आणि विजेचा प्रश्‍न अधिक चर्चेला गेला असल्यामुळं आता तो जरा वेगळ्या प्रकारे प्रकाशझोतात आलाय.

T Harish Rao
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली

शेती पंपासाठी पुरेसा वीजपुरवठा करण्यात येत नाही, शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा वीजबिलांची आकारणी करण्यात येते, या वीजबिलांची वसुली करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याची मोहीम राबवते, ही स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना त्याविरोधात आंदोलनं करावी लागतात. यावर्षीच्या अर्थसंकल्पीय विधी मंडळ अधिवेशनात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार (BJP Government) होते आणि आता काँग्रेस आघाडीचे सरकार (Congress Government) आहे. परंतु, दोन्ही सरकारे या भागातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करु शकल्या नाहीत. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले. केंद्र सरकारनं रब्बी धानाची खरेदी न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असं हरीश राव म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com