ज्या आमदारांना जायचं असेल ते जातील : अजित पवार (व्हिडिओ)

ज्या आमदारांना जायचं असेल ते जातील : अजित पवार (व्हिडिओ)

पिंपरी : काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये समाचार घेतला.वाटेवर असणाऱ्यांची नावे सांगा,असे आव्हान त्यांनी दिले. तसेच ज्यांना जायचे असेल, ते जातील,असेही ते म्हणाले. 

विखेंच्या विधानावर प्रतिक्रिया विचारणाऱ्या प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीची अजितदादांनी फिरकी घेतली. ती घेताना विखे यांची संभावना त्यांनी अप्रत्यक्षपणे कुणीही अशी केली. पक्षाचे नगरसेवक राहूल भोसले यांच्या हॉटेलचे उदघाटन करण्यासाठी ते शहरात आले होते.

त्यावेळी विखेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, उद्या कुणीही काहीही म्हणेल आणि त्यावर तुमचं म्हणणं काय, असं नको बाबा विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते व नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले विखे यांनी नुकतेच सोलापूर येथे दोन्ही कॉंग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान केले होते.त्याबाबत विचारले असता अजितदादा म्हणाले, त्यांनी नावे सांगावीत.तसेच जे वाटेवर असतील, तर ते जातील.

दरम्यान, शहराची झालेली कचराकुंडी व वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष वेधले असता त्यावर येत्या गुरुवारी सविस्तर भाष्य करणार आहे, असे ते म्हणाले. तसेच आमची सत्ता असताना अशा प्रश्नी जातीने लक्ष घालत होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नुकतेच राजीनामा दिलेले पक्षाचे पालिकेतील गटनेते तथा पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यासह शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस आयुक्तांशी आजच बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com