साताऱ्यातील टेंभू उपसा योजनेला मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई : सातारा, सांगली, सोलापूरमधील दुष्काळी भागाचे वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या 4088 कोटी रूपयांच्या खर्चाला आज (गुरुवार) मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे वरील जिल्ह्यातील सात तालुक्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

या योजनेनुसार टेंभूजवळील कृष्णा नदीवर बॅरेज बांधून 22 अब्ज घनफूट पाणी उचलण्यात येणार आहे. हे पाणी दुष्काळी भागातील 7 तालुक्यातील 80 हजार हेक्टर शेतीला सिंचनासाठी वापरण्यात येईल. याशिवाय सुधारित योजनेनुसार हे पाणी बंद पाईपाद्वारे पुरवण्याचा सरकारचा मानस आहे. पश्चिम महाराष्ट्रात टेंभू प्रकल्पाचे विशेष महत्व आहे.

सांगोला, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ जत या सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना टेंभू वरदान ठरले आहे. त्याच धर्तीवर आता सातारा जिल्ह्यात देखील टेंभूची उपसासिंचन योजना राबवून कायम दुष्काळी तालुक्यांची तहान भागवण्याची ही योजना ठरणार आहे. 

Web Title: Tembhu Scheme Approved of Satara has approved