राज्यातील तापमानात घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने राज्याच्या तापमानातही घट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे.  राज्यात सर्वांत नीचांकी तापमान नगर येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा हा प्रभाव असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. नगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, वर्धा येथे तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरले आहे.

पुण्यात पारा १२ अंश
पुण्यात किमान तापमाचा पारा १२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. . पुढील चार दिवसांमध्ये शहर आणि परिसरातील हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Temperature decrease in state Cold