मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे.

शुक्रवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २९) राज्यातील थंडी कायम राहणार असून, विदर्भात लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांमध्ये गोठविणारी थंडी आली आहे. पंजाबच्या भाटींडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

या भागात १ जानेवारीपासून पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढणार असल्याने उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातही हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. हे वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे. 

राज्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी घटले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची तीव्रता अधिक असून, नागपूरच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ७ अंशांची घट झाली आहे. जळगाव, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने तर निफाडमध्ये तापमान ४ अंशांवर आल्याने थंडीची लाट आली आहे. पुणे, नाशिक, मालेगाव, महाबळेश्वर, औरंगाबाद, उस्मानाबाद, गोंदिया येथेही तापमान १० अंशांपेक्षा खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

Web Title: Temperature decreased in Central Maharashtra, Marathwada, Vidarbha due to Cold wave in Maharashtra