esakal | महाराष्ट्रातून दहा दिवसांत तब्बल एवढे मजूर पोहचले स्वगृही

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

ममतांना होती व्यवस्थेची काळजी 
पश्चिम बंगालमधील प्रवासी मजुरांच्या गाड्या त्यांच्या राज्यात सर्वात शेवटी गेल्या. याबाबत पवार म्हणाले," परराज्यात कामानिमित्त असलेले मजुर जर पश्‍चिम बंगालमध्ये एकाचवेळी परतले तर व्यवस्था कोलमडून जाईल, अशी काळजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना होती. एकाचवेळी ८ ,९ गाड्या परतल्या तर त्यातील मजुरांची तपासणी कशी होणार ,कामगारांची व्यवस्था कशी करणार याची चिंता होती, पण तो प्रश्न मार्गी लागला आहे.

महाराष्ट्रातून दहा दिवसांत तब्बल एवढे मजूर पोहचले स्वगृही
sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - राज्यातील स्थलांतरितांची परतीची व्यवस्था केली जात असून यासाठी वेगवेळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालयात समन्वय साधण्यात आला आहे. याप्रमाणे कालपर्यंत ९३ रेल्वेगाड्या सोडल्या असून या माध्यमातून महाराष्ट्रातून १ लाख २३ हजार ७२५ प्रवासी त्यांच्या गावी परतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार म्हणाले, 'कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी परवानग्या काढाव्या लागतात. स्थलांतरित मजुरांची यादी तयार करून परवानगीची प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे आवश्यक असते. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी यासाठी आवश्यक ते प्रयत्न करतातच पण थेटपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला तर गती मिळते.’’.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता उत्पन्नाची मर्यादा

ममतांना होती व्यवस्थेची काळजी 
पश्चिम बंगालमधील प्रवासी मजुरांच्या गाड्या त्यांच्या राज्यात सर्वात शेवटी गेल्या. याबाबत पवार म्हणाले ," परराज्यात कामानिमित्त असलेले मजुर जर पश्‍चिम बंगालमध्ये एकाचवेळी परतले तर व्यवस्था कोलमडून जाईल, अशी काळजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना होती. एकाचवेळी ८ ,९ गाड्या परतल्या तर त्यातील मजुरांची तपासणी कशी होणार ,कामगारांची व्यवस्था कशी करणार याची चिंता होती, पण तो प्रश्न मार्गी लागला आहे.