दहावीचे गणित पुस्तक अवघ्या एका पानात 

युवराज पाटील
गुरुवार, 5 जुलै 2018

शिरोली पुलाची : दहावीचे गणिताचे पुस्तक अवघ्या एका पानात बांधण्याचे काम गणित अभ्यासक दीपक शेटे यांनी केले आहे. स्मार्टफोनमध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो. तोच वेळ गणितासाठी देता यावा या उद्देशाने शेटे यांनी क्‍यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि अडीच महिन्यांत ते पूर्ण केले. 

शिरोली पुलाची : दहावीचे गणिताचे पुस्तक अवघ्या एका पानात बांधण्याचे काम गणित अभ्यासक दीपक शेटे यांनी केले आहे. स्मार्टफोनमध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो. तोच वेळ गणितासाठी देता यावा या उद्देशाने शेटे यांनी क्‍यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि अडीच महिन्यांत ते पूर्ण केले. 

गणित विषय अवघड, किचकट म्हणून नावडीचा म्हणणारे असंख्य आहेत. तो रुचणार नाही असे मनात पक्के रुजलेल असते. त्यामुळे आवडीच्या पद्धतीने गणिताचा अभ्यास करता यावा यासाठी शेटे सातत्याने प्रयत्नशील आहेत. दहावीच्या गणिताच्या पुस्तकातील सर्व संकल्पनांचा त्यांनी यू-ट्यूबवर शोध घेतला. प्रत्येक संकल्पनेवर यू-ट्यूबवर पन्नास ते साठ पर्याय उपलब्ध होते. कमीतकमी वेळेत संकल्पना स्पष्ट करणारा आणि सहजरीत्या विद्यार्थ्यास समजेल असा व्हिडिओ घेण्याचे ठरले. एक व्हिडिओ निश्‍चित करून त्याचा क्‍यूआर कोड तयार केला. अशा पद्धतीने पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील सर्व संकल्पनांचे आणि त्यातील घटकांचे क्‍यूआर कोड तयार केले. हे सर्व कोड अवघ्या एका पानात सामावले आहेत. अशा पद्धतीने अडीच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर गणिताच्या डिजिटल पुस्तकाचा प्रवास पूर्ण झाला. 

असा करू शकता वापर 
* गणिताचे भाग एक व दोन ही दोन्ही पुस्तके "डिजिटल स्मार्ट टेक्‍स्ट बुक' या नावाने तयार केलीत. 
* सर्व पुस्तक एका पानात आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक ते पाकिटात ठेवू शकतात. 
* या पानाची झेरॉक्‍स प्रतही वापरता येते. 
* पुस्तकातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पालकांबरोबर शिक्षकांना फायदेशीर. 
* व्हिडिओ 3 ते 14 मिनिटांचे आहेत. 
* कोणत्याही वेळी गणितातील समस्येचे उत्तर सहजरीत्या मिळू शकते. 
* प्रवासातही उपयुक्त, हाताळण्यास सोपे 
* स्मार्टफोनमध्ये क्‍यूआर कोड स्कॅनर व इंटरनेटची आवश्‍यकता. 

व्हिडिओ स्वरूपात पाहिलेले सहज समजते आणि जास्त काळ स्मरणात राहते. यामुळेच गणिताचे पुस्तक डिजिटल केले आहे. यातील व्हिडिओ पाहून, सर्व संकल्पना स्पष्ट होतील आणि गणितातील विद्यार्थ्यांची गोडी वाढेल. 
- दीपक शेटे, शिक्षक 

Web Title: The tenth grade mathematics book is just one page