दहावी- बारावी परीक्षेची ठरली तारीख ! बॅकलॉग विद्यार्थ्यांची 20 नोव्हेंबरपासून परीक्षा

212SPPU_Students_20_20Copy_20_20Copy.jpg
212SPPU_Students_20_20Copy_20_20Copy.jpg

सोलापूर : कोरोनामुळे दहावीचा भुगोल पेपर रद्द झाल्यानंतर पुणे बोर्डाने 'बेस्ट ऑफ फाईव्ह'द्वारे निकाल जाहीर केला. मात्र, 15 जूनपासून सुरु होणारे शैक्षणिक वर्ष अद्यापही निश्‍चित होऊ शकले नाही. तत्पूर्वी, दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणेही कोरोनामुळे कठीण झाले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत अखेर पुणे बोर्डाने या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबरपासून घेण्याचे निश्‍चित केले आहे.

ठळक बाबी...

  • दहावी- बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची तारीख 20 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत
  • 29 ऑक्‍टोबरनंतर विलंब शुल्कासह भरावा लागणार ऑनलाइन अर्ज
  • राज्यभरात दहावी- बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अंदाजित सव्वादोन लाखांपर्यंत
  • अर्ज भरल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबरपासून घेण्याचे बोर्डाचे नियोजन
  • शैक्षणिक वर्ष निश्‍चित न झाल्याने नियमित बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक अद्यापही अनिश्‍चितच
  • 31 ऑक्‍टोबरचा लॉकडाउनबद्दलचा निर्णय आणि आरोग्य विभागाच्या अभिप्रायानुसार परीक्षेचे नियोजन
  • परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळांमध्येच सोशल डिस्टन्सिंग ठेवून घेतली जाणार परीक्षा


दहावी व बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापूर्वी राज्य सरकार 31 ऑक्‍टोबरनंतर अनलॉकसंदर्भात काय निर्णय घेणार, यावर पुढील नियोजन ठरणार आहे. तर त्या काळात राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग तथा प्रादुर्भाव कसा राहील, याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्रायही बोर्ड घेणार आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा 5 डिसेंबरपर्यंत संपविण्याचे नियोजन करण्यात आले असून उद्या (बुधवारी) परीक्षेचे वेळापत्रक पुणे बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तर बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा 10 डिसेंबरपर्यंत संपविली जाणार आहे, असेही बोर्डातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


शैक्षणिक वर्ष निश्‍चित झाल्यानंतर परीक्षेचे नियोजन
कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षच अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेची तारीख अद्याप निश्‍चित होऊ शकलेली नाही. शैक्षणिक वर्ष निश्‍चित झाल्यानंतर आगामी बोर्डाची परीक्षा कधीपासून घ्यायची हे निश्‍चित होईल. तत्पूर्वी, मागील वर्षातील दहावी- बारावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. 
- डॉ. अशोक भोसले, सचिव, पुणे बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com