TET Exam Fraud: १५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

१५ जणांविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
TET Exam
TET Examsakal

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील १५ जणांविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने आरोपींविरोधात तीन हजार ६५५ पानी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे (वय ५८), शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (वय ३१), जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (वय ३२), एजंट अंकुश हरकळ (वय ४४), संतोष हरकळ (वय ४२),

क्लासचालक अजय नंदू चव्हाण (वय ३२), क्लासचालक कृष्णा शिवाजी जाधव (वय 33), क्लासचालक अंकित संतोष चनखोरे (वय २३), सुनील घोलप (वय ४८), मनोज डोंगरे (वय ४५), सुरंजित पाटील, स्वप्नील पाटील, सुशील खोडवेकर (वय ४३), राजेंद्र सोळुंके (वय ५२), मुकुंदा सूर्यवंशी (वय ३३) अशी त्यांची नावे आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह डॉक्टर, वाहनचालक, क्लासचालक, मध्यस्थ आदींचा समावेश आहे. आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत सायबर पोलिसांकडे कागदोपत्री तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावा असल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com