आता सामना मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेतील शिवसेना आणि भाजपची विधानसभा निवडणुकीप्रमाणे युती तुटली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सामना रंगणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोदी यांना बोलाविण्यात येणार असल्याचे भाजपतील सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यासाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात युतीला काडीमोड देण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा निर्णय भाजपच्या जिव्हारी लागला असून, त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात आता पंतप्रधान मोदींना उतरविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक असतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, असा सामना रंगणार आहे.

Web Title: Thackeray against Modi