सेनेत कोणी शिल्लक राहिलं असं वाटत नाही; शंभुराज देसाईंचा खळबळजनक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Shambhuraje Desai

सेनेत कोणी शिल्लक राहिलं असं वाटत नाही; शंभुराज देसाईंचा खळबळजनक दावा

सेनेत कोणी शिल्लक राहिलं असं वाटत नाही, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांशी बोलणी सुरू आहे. हे आमदार आमच्या पक्षात यायला तयार आहेत, असा गौप्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केला आहे.(Thackeray camps some mla contact with us says Shambhuraj Desai)

माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी अनेक दावे केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि दीपाली सय्यद यांच्या भेटीवर बोलताना देसाई म्हणाले, दिपाली सय्यद काही पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत नाहीये. ही त्यांची तिसरी चौथी भेट आहे.

शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील असं वाटत नाही. दिपाली सय्यद आमच्या गटात येत असतील तर स्वागत करू. दिपाली सय्यद यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट भक्कमच होईल, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.

तसेच, ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमची त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील. ठाकरे गटात आमदार नाराज आहेत. टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.

देसाई यांच्यापूर्वी, प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे आमदार अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. असा खुलासा केला होता. ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात. मी स्वत: पाहिलं आहे. अनुभवलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray