Uddhav Thackeray: पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray: पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदे गटात

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेते शिंदेंसोबत गेले. एकनाथ शिंदे यांनी देखील राज्याच्या कानाकोपऱ्यात शिंदेंची शिवसेना रुजवण्यासाठी कंबर कसली आहे. यातच शिंदे गटाने पुण्यात ठाकरे गटाचा धक्का दिला आहे.

ठाकरे गटाच्या बड्या नेत्यालाच शिंदे गटात घेतलं आहे. या बड्या नेत्याने ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख आणि मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब चांदेरे हे पुण्यातील बलाढ्य नेते आहेत.

भोर, पुरंदर आणि हवेली या तीन तालुक्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. या तिन्ही विभागाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पक्ष सोडण्याचे कारण सांगताना त्यांनी सांगितलं की, "महाविकास आघाडीत काम करत असताना घुसमट होत आहे."